विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन...

Post on 28-Jul-2015

323 views 10 download

description

एका चमत्कारचा अनुभव प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक गजानन जागीरदार यांना आपल्या जीवनात आला. आणि तो त्यांनी आपल्या ‘पाऊलखुणा’ या आत्मचरित्रात कथनाच्या ओघात सांगितला. त्याची चैतन्य देशमुख नावाच्या लेखकाने कोल्हापुरच्या पुढारी दैनिकातून ‘मरता क्या नहीं करता’ या मथळ्याच्या लेखाने जाहीर वाच्यता केली. संपादकांनी या लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. मात्र त्या मागवताना आपण या घटनेकडे बुद्धिवादी दृष्टीकोनातून पहात असून वाचकांनी ही तसेच पाहावे असे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून या घटनेची विज्ञानवादी उकल करणारा लेख मुद्दाम लिहून घेऊन प्रसिद्ध केला. दाभोळकरांचा तो लेख म्हणजे विज्ञानाच्या रुढ नियमांच्या चौकटीत ही घटना ओढूनताणून बसविण्याचा एक आडदांड प्रयत्न असून तो लिहून व प्रसिद्ध करून अनुक्रमे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पुढारीचे संपादक यांनी गजानन जागीरदारांवर घोर अन्य केला आहे. तो कसा केला आहे, हेच तेथे त्या लेखाची शास्त्रीय निकषांच्या आधारे छाननी करून दाखवून द्यायचे आहे.

Transcript of विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन...